क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केला एफआयआर


मुंबई – आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत की नाही यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी याचसंदर्भात आज एक अगदीच वेगळा दावा केला असून सध्या सोशल नेटवर्किंगवर हा दावा चर्चेचा विषय बनला आहे. समीर यांच्या वडिलांबरोबरच त्यांच्या पत्नीने म्हणजे क्रांती रेडकर यांनी दाऊद नाव निकाह नाम्यावर कुठून आले याबद्दलचे उत्तर एएनआयशी बोलताना दिले आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी सांगितले आहे. निकाहनामा बरोबर आहे. निकाह झाला, पण समीरने कायदेशीररित्या धर्म, जात बदलली नाही. माझी सासू मुस्लिम असल्यामुळे आणि त्यांच्या आनंदासाठी निकाह झाला, ही केवळ औपचारिकता होती. नवाब मलिक यांनी शेअर केलेले जन्म प्रमाणपत्र चुकीचे असल्याचे क्रांती रेडकर म्हणाल्या.

नवाब मलिक आमचे वैयक्तिक फोटो शेअर करून घेतलेल्या त्यांनी संवैधानिक शपथेविरुद्ध काम करत आहे. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा त्यांचा एकच हेतू आहे, जेणेकरून त्यांच्या जावयाला वाचवता येईल, असा आरोप देखील क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे.