या देशाच्या राष्ट्रपती कन्येने केला हिंदू धर्माचा स्वीकार

भारत आणि इंडोनेशिया या देशांसाठी बुधवार हा खास दिवस ठरला. इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांच्या तीन नंबरच्या कन्या, सुकमावती यांनी इंडोनेशियातील हिंदू बहुल बेट बाली येथे २६ ऑक्टोबर रोजी विधिवत इस्लाम धर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार केला. या दिवशीच सुकमावती यांचा ७० वा वाढदिवस होता. हा सोहळा कडक सुरक्षेत पार पडला आणि कार्यक्रमाला ५० पाहुणे उपस्थित होते.

मुळात देशात कोविड १९ ची साथ असल्याने पाहुण्यांच्या संख्येवर निर्बंध होते त्यामुळे ५० लोकांना आमंत्रित केले गेले असे सांगितले जात आहे. सीएनएन इंडोनेशियाने काही दिवसापूर्वीच सुकमावती इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार असल्याची माहिती दिली होती. ७० व्या वर्षी धर्मांतरण करण्याच्या त्यांच्या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित केले गेले होते मात्र त्यांचे भाऊ, बहिणीनी सुकमावती यांचे समर्थन केले तर मुलांनी आईच्या निर्णयाचे स्वागत केले.

मिळालेल्या माहितीनुसार सुकमावती यांच्या आजीना हिंदू धर्माची खोल जाण होती. त्यांच्या प्रभावामुळे सुकमावती यांनाही प्रथमपासून हिंदू धर्माचे आकर्षण होते आणि त्यांनी हिंदू परंपरा, सिद्धांत यांची पूर्ण माहिती करून घेतली होती. सुकमावती इंडोनेशिया नॅशनल पार्टीच्या संस्थापक आहेत. २०१८ मध्ये त्यांनी एका कवितेचे वाचन केल्यावर त्यांच्यावर इस्लाम धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला गेला होता आणि ईशनिंदा केल्याप्रकरणी केस दाखल केली गेली होती. त्यानंतर सुकमावती यांनी माफी मागितली होती असेही समजते.