समीर वानखेडे प्रकरण ; जास्मिन वानखेडेंचे नवाब मलिकांना चॅलेंज


मुंबई – एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर आज वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि बहीण जास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला धमकावण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप हे चुकीचे असून ते समीर वानखेडेंचा जन्माचा दाखला का शोधत असल्याचा प्रश्न जास्मिन वानखेडेंनी उपस्थित केला आहे. तसेच समीर वानखेडेंविरोधात सुरु असलेला हा सर्व प्रकार पैसे देऊन घडवला जात असल्याची माहिती आपल्याला मिळाली, असल्याचेही जास्मिन वानखेडे म्हणाल्या आहेत.

समीर वानखेडेंच्या जन्माच्या दाखल्यावरुन प्रश्न विचारला असता, तो दाखला ते कशाला शोधत आहेत, त्यांची रिसर्च टीम अशी आहे की ते मुंबईतील फोटो दुबईचा सांगतात. तुम्ही त्यांचा जन्मदाखला का काढत आहात हा आमचा प्रश्न असल्याचे त्या म्हणाल्या. असे आरोप समीर वानखेडेंवर का केले जात आहेत?, असा प्रश्न जास्मिन वानखेडेंना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी, आज काय परिस्थिती आहे बघा. आमचे काम काय आहे आणि आम्हाला ते सोडून तुमच्याशी बोलावे लागत आहे. आम्ही वर्किंग महिला आहोत. आम्हाला धमक्या मिळत आहेत, जीवे मारु असे धमकावले जात आहे. कापून टाकू, मारुन टाकून असे कॉल येत आहेत. मला पण असे वाटते की मी रोज प्रेस कॉन्फरन्स घेतल्या पाहिजेत आणि आरोप, दावे केले पाहिजे. आता हे मीडिया ट्रायल असल्याचे वाटत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपली बाजू मांडताना क्रांतीनेही नवाब मलिक यांनी केले आरोप खोडून काढले. त्यांनी म्हटले की गोंधळ जन्माच्या दाखल्यापासून सुरु होतो, असे ते म्हणाले. रिलिजन, कास्ट सगळ्याची कागदपत्रे आम्ही दिली आहे. सरकारी कागदपत्रे हे पुरावा म्हणून भारतात सगळे काही असते, असे क्रांती म्हणाली. यामधून समीर वानखेडे नक्कीच बाहेर पडतील. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. पोलीस स्थानकात तक्रार केलेली नसल्याचे जास्मिन वानखेडेंनी सांगितले. आम्हाला शिवीगाळ करणारे आणि धमकावणाऱ्या कमेंट्सचे आम्ही स्क्रीनशॉर्ट घेतले आहेत. या मागे कोणत्या पीआर यंत्रणा आहेत कोण डेथ थ्रेट देतात याचे स्क्रीनशॉर्ट संबंधित यंत्रणांकडे दिले आहेत. जो कोण धमकावण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा पर्दाफाश होईल, असे क्रांती म्हणाली.

आज नवा दावा त्यांनी ट्विटरवरच केला आहे. त्यांच्याकडे पुरावे आहेत का? असा प्रश्न जास्मिन वानखेडेंनी नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात छेडले असता उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना, मलिक अनोखळी कागदपत्रे देतात. एवढे पुरावे आहेत, तर न्यायालयात जा, आम्ही न्यायालयात लढू, असं थेट आव्हान जास्मिन वानखेडेंनी मलिक यांना दिले आहे. मालदीवमध्ये बॉलिवूडचे कोण लोक होते ते आम्हाला सांगा. आम्ही दोघी एकत्र गेलो नव्हतो. आम्हाला एकही सेलिब्रेटी दिसली नाही. ते बकवास करत आहेत, असे जास्मिन वानखेडे म्हणाल्या. या साऱ्या मागे पेड लॉबी असल्याचे आम्हाला कळले असल्याचेही जास्मिन वानखेडेंनी सांगितले.