राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान; अभिनेते दिग्दर्शक अरबाज खान, जैन साध्वी डॉ सहेजा सन्मानित


मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सिने कलाकार, उद्योजक, समाजसेवक यांसह विविध क्षेत्रातील ३० व्यक्तींना राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्र शक्ती फाऊंडेशनतर्फे राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात सिने अभिनेते – दिग्दर्शक अरबाज खान, जैन साध्वी डॉ. सहेजा, उत्तराखंडचे उपमहाधिवक्ता डॉ. वीरेंद्र रावत, डॉ. गुरुमुख जगवानी, महेश राठी, प्रबोध डावखरे, मोहन कावरी, लक्ष्मण कानल सिमरन आहुजा, अनिता पिटर, अनुषा श्रीनिवासन अय्यर, फिरोज खान, आदींना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर राष्ट्र शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गुजराणी व डॉ. वीरेंद्र रावत उपस्थित होते.