आगामी २४ तासात जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळू शकते कोव्हॅक्सिनला मिळू शकते मान्यता


नवी दिल्ली – आज कोव्हॅक्सिन लसीवरील कागदपत्रांचे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) तांत्रिक सल्लागार गट पुनरावलोकन करत आहे. अद्याप डेटा पुनरावलोकन सुरु असुन पुढील २४ तासात कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळू शकते. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील २४ तासांत ही भारतीय लस आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली जाऊ शकते.

पत्रकारांना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी सांगितले की, तांत्रिक सल्लागार गट भारतात उत्पादित कोरोना प्रतिबंधक लसीवरील डेटाचे पुनरावलोकन करत आहे. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास आणि तांत्रिक सल्लागार गटाचे समाधान झाल्यास, कोव्हॅक्सिनला पुढील २४ तासांत आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळू शकते. दरम्यान कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास भारत सरकारने आपल्या देशात मान्यता दिली आहे, परंतु जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता नसल्यामुळे, ज्या नागरिकांना लस मिळाली आहे, ते सध्या परदेशात जाऊ शकत नाहीत.