मुंबई – अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंचाने लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ‘एनसीबी’वरील लाचखोरीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पण एनसीबीने आरोप फेटाळले आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नवाब मलिक यांनी ट्विटरला एक फोटो शेअर केला आहे.
समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो नवाब मलिकांनी केला शेअर ?
Pehchan kaon? pic.twitter.com/S3BOL4Luc8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो नवाब मलिक यांनी शेअर केला आहे. त्यांनी यावेळी पेहचान कौन? असे उपहासात्मक ट्विट देखील केले आहे. नवाब मलिक यांनी शेअर केलेला हा फोटो क्रॉप केल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील हा फोटो असल्याचे बोलले जात आहे. कमेंटमध्ये अनेकांनी हा त्यांच्या पहिल्या लग्नातील फोटो असल्याचे म्हटले आहे. पण नवाब मलिक यांनी याबाबत ट्विटमध्ये काही उल्लेख केलेला नाही.
Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा pic.twitter.com/rjdOkPs4T6
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
दरम्यान आणखी एक ट्विट नबाव मलिक यांनी केले असून यामध्ये समीर वानखेडेंशी संबंधित कागदपत्राचा फोटो शेअर केला आहे. समीर वानखेडे यांचा सगळा घोटाळा येथूनच सुरु होत असल्याचे यात त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचा फोटो शेअर केला असून आहे. यामध्ये त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असून धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे समीर वानखेडे पती आहेत. २०१७ मध्ये क्रांती आणि समीर वानखेडे यांचे लग्न झाले. त्यांना जुळी मुलेही आहेत. दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या फोटोमुळे समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. क्रांती रेडकरसोबत लग्न करण्याआधी समीर वानखेडे यांचे डॉ शबाना कुरेशी यांच्याशी विवाह झाल्याचा दावा केला जात आहे. पण याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.