‘सुर्यवंशी’चे नवे पोस्टर तुमच्या भेटीला


कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. या चित्रपटाचे प्रदर्शन जवळपास वर्षभरापासून थांबलेले आहे. आता दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये संपूर्ण टीम ही लागली आहे. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचा आणखी एक पोस्टर रिलीज केले आहे.


चित्रपट समिक्षक तरन आदर्श यांनी चित्रपटाचे हे नवीन पोस्टर शेअर केले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या या पोस्टमध्ये अक्षय दिसत आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की या दिवाळीला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला चित्रपटगृहात घेऊन या. या आधी रणवीर सिंग, अजय देवगन आणि अक्षय कुमारचे आयला रे आयला हे गाणे रिलीज करण्यात आले होते. हे गाणे अक्षयच्याच खट्टा मिठा या चित्रपटातील आहे.

आधी हा चित्रपट २४ मार्च २०२० मध्ये रिलीज होणार होता. पण, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नियमांना पाहता चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आता ५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगनने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.