‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटांसाठी कंगनाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार


सोमवारी नवी दिल्लीत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहेत. उपराष्ट्रपति व्यकंया नायडू यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यात कंगना राणावतला ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तर मनोज वाजपेयीला ‘भोंसले’ आणि धनुषला को ‘असुरन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कंगनाने पुरस्कार मिळवल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. पुरस्कार घेतानाचे फोटो शेअर करत तिने लिहिले, मी आज मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी आणि पंगासाठी संयुक्तिक राष्ट्रीय पुरस्कार घेत आहे. मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी मीच दिग्दर्शिक केले होते. या चित्रपटातील टीमचे मी आभार मानते.

2008 मध्ये कंगनाला पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फॅशन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2014 मध्ये दुसरा पुरस्कार सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून आणि त्यानंतर 2015 मध्ये तनु वेड्स मनु या चित्रपटासाठी मिळाला होता. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर स्टारर ‘छिछोरे’ सर्वोत्कृष्ठ हिंदी चित्रपट म्हणून निवडला गेला आहे. तर मनोज बाजपेयीला ‘भोंसले’ आणि धनुषला ‘असुरन’ साठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता असे पुरस्कार मिळाले आहेत.