पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ


सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर या साखर कारखान्याचा सन 2021 -22 च्या 48 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या शुभारंभाप्रसंगी कारखान्याचे संचालक सुरेश माने, जि. प. चे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यासह विद्यमान संचालक व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या वर्षी सह्याद्री साखर कारखान्यामार्फत जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यासाठी ऊसतोड मजूरांसह कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.