काल दिवसभरात देशात 14,306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 443 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून देशात 15 हजार कोरोनाबाधितांची होत आहे. दरम्यान आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 14,306 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 443 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 18,762 बाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 41 लाख 89 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 54 हजार 712 बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 67 हजार बाधितांनी कोरोना मात केली आहे. देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांहून कमी आहे. एकूण 1 लाख 67 हजार 695 कोरोनाबाधित अद्याप उपचार घेत आहेत.

काल दिवसभरात केरळमध्ये 8,538 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे केरळमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून 49 लाख 6 हजार 125 वर पोहोचली आहे. याव्यतिरिक्त 363 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 28,592 वर पोहोचला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत हळहळू घसरण होत आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 1,410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 18 बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल दिवसभरात राज्यात 1,520 बाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.46 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील मृत्यूदरातही सातत्याने घट होत असून तो 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आज 23,894 इतकी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7210 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल दिवसभरात आर्थिक राजधानी मुंबईत 408 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 531 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 7,30,714 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात मुंबईत सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4356 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1328 दिवसांवर गेला आहे.