अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी माईकल मर्सीएरने जगातील पहिली लग्झरी स्पोर्ट्स हॉवरक्राफ्ट सादर केली असून एखाद्या लग्झरी कार प्रमाणे तिचे रूप आहे. हे वाहन जमीन आणि पाण्यात सारख्याच वेगाने प्रवास करू शकणार आहे. जगातील बहुतेक सर्व देशांच्या नौसेना समुद्र किंवा किनारी भागात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हॉवरक्राफ्टचा वापर करतात.
मिळालेल्या माहितीनुसार या लग्झरी स्पोर्ट्स हॉवरक्राफ्टचे डिझाईन प्रथम २०१४ साली बनविले गेले होते मात्र प्रत्यक्ष वापर करताना त्यात अनेक अडचणी आल्याने हे डिझाईन अपग्रेड केले गेले असून आता ते २०२१ लग्झरी स्पोर्ट्स हॉवरक्राफ्ट ‘अरोसा’ नावाने सादर केले गेले आहे. ही सुपरकार स्पीड बोट आहे. तिची बॉडी कार्बन फायबर पासून बनविली गेली असून या दोन सिटर कारला खुले कॉकपिट आहे. ते डेकशी बॅलन्स केले गेले आहे. ही सुपरकार स्पीड बोट पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरवर चालते त्यामुळे तिच्या इंजिनचा आवाज अगदी कमी येतो शिवाय प्रदूषण होत नाही. याला खालच्या भागात एअर कुशन दिले गेले आहे.
ही सुपरकार स्पीड बोट जमीन, पाणी, गवताळ प्रदेश, वाळवंट, उजाड भाग अश्या कुठल्याही पृष्ठभागावर त्याच स्पीडने चालू शकते असा दावा केला जात आहे. अर्थात हॉवरक्राफ्ट सार्वजनिक रस्त्यांवर चालविण्यास बऱ्याच देशात परवानगी नाही कारण त्यांना नौका कॅटेगरी मध्ये समविष्ट केले गेले आहे. त्यामुळे अरोसा रस्त्यावर चालविताना विशेष परवानगी काढावी लागणार आहे असे सांगितले जात आहे.