काल दिवसभरात १६,३२६ कोरोनाबाधितांची नोंद, तर ६६६ रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशात काल दिवसभरात १६ हजार ३२६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ६६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान २२ ऑक्टोबरपर्यंत केरळमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या २७ हजार ७६५ एवढी झाली आहे. हा आकडा केरळने मागील आकडेवारीतील ५६३ मृत्यू समाविष्ट केल्यानंतर झाली आहे. केरळ सरकारने २१ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना मृत्यूंची एकूण संख्या २७ हजार २०२ एवढी होती. शुक्रवारी ९९ मृत्यूंची नोंद झाली.

त्याचबरोबर पुरेशा कागदपत्रांअभावी आकडेवारीत समाविष्ट करायचे राहिलेले १४ जून २०२० पर्यंतच्या २९२ मृत्यूंचाही समावेश एकूण आकडेवारीत करण्यात आला. तसेच नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार १७२ मृत्यूंचा समावेश कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आला. यासह केरळमधील एकूण मृतांची संख्या २७ हजार ७६५ झाली असल्याची माहिती केरळ आरोग्य विभागाने दिली आहे.