१६० वर्षापूर्वी दिल्लीत दाखल झाला होता पहिला एफआयआर


चोरी, मारहाण, खून, फसवणूक असा कोणताही गुन्हा घडला असेल तर संबंधित व्यक्तीला त्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवावी लागते हे आपण जाणतो. या तक्रारीनुसार पोलीस प्राथमिक माहिती अहवाल म्हणजे एफआयआर नोंदवून घेतात. रिपब्लिक चॅनलचे अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात एकाच वेळी २०० एफआयआर दाखल झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सोशल मीडियावर सध्या एका एफआयआरची कॉपी वेगाने व्हायरल झाली असून हा एफआयआर दिल्लीच्या सब्जी मंडी पोलीस ठाण्यात १८ ऑक्टोबर १८६१ ला म्हणजे चक्क १६० वर्षापूर्वी नोंदविलेला आहे.

निवृत्त आयपीएस अधिकारी आणि आयबीचे माजी विशेष संचालक यशोवर्धन आझाद यांनी ही कॉपी ट्विटरवर पोस्ट केली आहे. उर्दू भाषेत हा एफआयआर लिहिला गेला असून ज्या व्यक्तीने तो दाखल केला त्यात अपराधाची माहिती देताना हुक्का, स्वयंपाकाची काही भांडी घरातून चोरीस गेल्याची तक्रार नोंदविली आहे. चोरीस गेलेल्या मालाची अंदाजे किंमत ४५ आणे म्हणजे त्यावेळच्या हिशोबात २ रुपये ८१ पैसे आहे. तक्रारदार आहेत मोहम्मद यारखान यांचा मुलगा माईउद्दीन. हे कुटुंब कटारा शीशमहाल येथे राहणारे आहे.

त्याकाळी दिल्ली मध्ये पाच पोलीस ठाणी होती. विशेष म्हणजे सब्जी मंडी पोलीस ठाण्यात दाखल झालेले अनेक रिपोर्ट आजही सुरक्षित ठेवले गेले आहेत. ३० एप्रिल १८९५ मध्ये खेचर हरविल्याची तक्रार, १६ फेब्रुवारी १८९१ मध्ये दोन आणे किमतीची ११ संत्री चोरी तक्रार, १५ मार्च १८९७ मध्ये पाच आणे किमतीचा पायजमा चोरीस गेल्यची तक्रार अश्या रिपोर्टचा त्या मध्ये समावेश आहे.