टी-२० विश्वचषक ; हाय व्हॉल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानी संघाची घोषणा


दुबई – टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या हाय व्हॉल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानाने १२ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यापैकी अकरा खेळाडूंचे नाव सामन्यापूर्वी निश्चित होणार आहे. उद्या म्हणजेच २४ ऑक्टोबरला संध्याकाळी ७.३० वाजता दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. पाकिस्तानने तत्पूर्वी आपल्या १२ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात पाकिस्तानच्या अंतिम १२ संघात शोएब मलिकला स्थान देण्यात आले आहे. शोएब मलिकची स्थानिक क्रिकेटमध्ये कामगिरी पाहता त्याची निवड करण्यात आली आहे. तसेच मोहमद हफीजचाही १२ जणांमध्ये समावेश करण्यात आला आहे.


पाकिस्तानचा संघ – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरीस रऊफ, हैदर अली

सुपर १२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा पहिला सामना आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. पण विश्वचषक स्पर्धेमधील रेकॉर्ड पाहता दोन्ही संघ आतापर्यत ५ वेळा आमनेसामने आले आहेत. पाचही वेळा भारताने विजय मिळवला आहे. भारताने तत्पूर्वी दोन सराव सामन्यात विजय मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांना पराभूत केल्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड आहे.