मुंबई – अभिनेत्री अनन्या पांडे हिला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी चांगलेच झापले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अनन्या काल चौकशीसाठी उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडे चांगलेच संतापले होते. 11 वाजताची वेळ चौकशीसाठी दिली असताना अनन्या दुपारी 2 वाजता पोहोचली, त्यामुळे समीर वानखेडे यांनी तिला खडेबोल सुनावले.
लेटलतीफ अनन्या पांडेला समीर वानखेडेंनी झापले
एनसीबीने काल सलग दुसऱ्या दिवशी अनन्याला चौकशीसाठी बोलावले होते. अनन्याला एनसीबीने सकाळी 11 वाजताची वेळ दिली होती. पण ती तीन तास उशीरा म्हणजे 2 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली. अनन्याला त्याआधी देखील एनसीबीने 2 वाजताची वेळ दिली होती, पण 4 वाजता अनन्या पोहोचल्यामुळे एनसीबी त्या दिवशी व्यवस्थित चौकशी करु शकली नाही.
सलग दुसऱ्या दिवशी ती उशीरा आल्यामुळे समीर वानखेडे यांनी तिला चांगलेच झापले आहे. समीर वानखेडे यांनी म्हटले की, 11 वाजता तुम्हाला बोलावले आणि तुम्ही आता आले आहात. तुमची वाट पाहात अधिकारी बसलेले नाहीत. हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाही. हे सेंट्रल एजेंसीचे ऑफिस आहे. तुम्हाला ज्यावेळेवर बोलावले आहे, त्याच वेळेवर पोहोचा, अशी तंबी देखील त्यांनी अनन्याला दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.