दीर्घकालच्या चर्चेनंतर अॅपल एसई लाईनअप मधील स्मार्टफोन आयफोन एसई ३ बाजारात आणण्यासाठी सिद्ध झाले असल्याचे समजते. आयफोन एसई २०२० चा फॉलोअप फोन एसई ३ नावाने लाँच केला जाईल अशी बातमी लिक झाली आहे. वास्तविक हा फोन या वर्षातच बाजारात येईल अशी अपेक्षा होती पण मिळालेल्या माहितीनुसार एसई ३ हा फाईव्ह जी सपोर्ट करणारा फोन मार्च एप्रिल २०२२ मध्ये बाजारात आणला जाईल.
येतोय स्वस्त फाईव्ह जी आयफोन एसई ३
माय ड्रायव्हर्सच्या रिपोर्ट नुसार आयफोन एक्सआर प्रमाणेच या बजेट फोनचे डिझाईन असेल. त्याला वाईड नॉच कटआउट स्क्रीन दिला जाईल. होम बटन एम्बेडेड टच आयपी सह ४.७ इंची डिस्प्ले असेल आणि त्याला वन सायडेड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. ६४ जीबी व्हेरीयंटची किंमत साधारण ३८६६० तर १२८ जीबी व्हेरीयंटची किंमत साधारण ४४९०० पर्यंत असेल असेही या माहितीत म्हटले गेले आहे.