सट्टेबाजांची टी २० वर्ल्ड कपची पहिली पसंती टीम इंडिया


टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तानबरोबर रविवारी पहिला सामना खेळत असतानाच सट्टेबाज सक्रीय झाले असून बेट ३६५ आणि लॅडब्रोक्स या ऑनलाईन बेटिंगवर या वेळचा वर्ल्ड कप कुणाचा यावर बेटिंग सुरु झाले आहे. या दोन्ही साईटनुसार या वेळी टीम इंडिया वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात असून त्या खालोखाल इंग्लंडचा नंबर आहे. टीम इंडियाने २००७ मध्ये पाकिस्तानला हरवून पहिला टी २० वर्ल्ड कप जिंकला होता आणि टीम इंडियाचे टी २० मधले रेकॉर्ड उत्तम आहे. भारताने ३३ सामन्यातील २० जिंकले आहेत. आयपीएल मध्ये सुद्धा भारतीय खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे.

यामुळे सट्टा खेळणाऱ्यात टीम इंडियाला सर्वाधिक पसंती दिसून येत आहे. लॅडब्रोक्सवर टॉप सात टीम मध्ये द, आफ्रिका सर्वात शेवटी आहे. त्यांनी भारत आणि इंग्लंड नंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा नंबर लावला आहे तर बेट ३६५ ने वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडला भारत आणि इंग्लंड नंतर पसंती दिली आहे.

साडेपाच वर्षाच्या खंडानंतर हा वर्ल्ड कप होतो आहे. २००७ नंतर त्यात खूप बदल झाले आहेत. २०२१ वर्ल्ड कप मध्ये एका डावात २ रिव्यू मिळणार आहेत, १० ओव्हर्स नंतर ड्रिंक ब्रेक आहे. गेल्या दोन टी २० वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाच्या विराट कोहलीची कामगिरी चमकदार झाली असून दोन वेळा प्लेअर ऑफ द सिरीज ठरणारा तो एकमेव खेळाडू आहे.