अनन्या पांडेची एनसीबीसमोर आर्यन खानला गांजा दिल्याची कबुली


मुंबई – अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे हिने आर्यन खान प्रकरणाच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. अनन्याने एनसीबीच्या चौकशीदरम्यान आर्यन खानला गांजा दिल्याची कबुली दिली आहे. आर्यन खानसोबत झालेल्या चॅटिंगवरुन एनसीबी अनन्याची चौकशी करत आहे. अनन्याने शुक्रवारी चौकशीदरम्यान आर्यनला एक ते दोन वेळा गांजा दिल्याची कबुली दिली आहे. पण आपण कोणत्याच ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात नसल्याचेही यावेळी तिने एनसीबीला सांगितले.

अनन्याला सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास एनसीबीने सांगितले होते. पण दुपारी 2 वाजता अनन्या पोहोचली, त्यामुळे समीर वानखेडे यांनी तिला खडेबोल सुनावले. समीर वानखेडे यांनी म्हटले की, तुम्हाला 11 वाजता बोलावले आणि आपण आता आले आहात. अधिकारी तुमची वाट पाहात बसलेले नाहीत. हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाही. हे सेंट्रल एजेंसीचे ऑफीस आहे. ज्यावेळेवर बोलावले आहे, त्याच वेळेवर पोहोचा, अशी तंबीही त्यांनी अनन्याला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनन्याने चौकशीदरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अनन्या पांडेने एनसीबीच्या चौकशीत मान्य केले की तिने आर्यन खानला वीड म्हणजेच गांजा आणून दिला होता, पण ती कुठल्याही ड्रग्स सप्लायरच्या संपर्कात नव्हती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या हाती जे चॅट लागले आहेत, त्यानुसार एनसीबीला अनन्या पांडेने सांगितले की, ती गांजा सप्लाय करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात नाही. पण तिचा एक मित्र आहे, जो खूप मोठा व्यक्ती आहे. त्याला सांगितल्यावर तो गांजा अरेंज करून देतो. या मित्राकडून आर्यन खानच्या सांगण्यावरून फक्त एकदा किंवा दोनदाच त्याला गांजा आपल्या मागून दिला. अनन्याच्या मित्राने त्याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून गांजा पाठवला होता, असे अनन्याने एनसीबीला सांगितले. अनन्याने हा गांजा आपल्या स्टाफ द्वारे कलेक्ट केला होता, जो नंतर तिने आर्यनला दिला.

एनसीबीची टीम या हाऊस स्टाफला घेऊन शुक्रवारी पहाटे एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. ज्याचा उल्लेख अनन्या पांडे आणि आर्यन खानच्या चॅट मध्ये केला होता. काल सायंकाळी एनसीबीने या हाऊस स्टाफ कर्मचाऱ्याला जाऊ दिले, पण सोमवारी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तसेच या हाऊस स्टाफ कर्मचार्‍याचा फोन एनसीबीने जप्त केला आहे.

एनसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हाउस स्टाफ कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये आणि मोबाईलच्या चॅटच्या माध्यमातून एका बड्या आणि नावाजलेल्या सेलिब्रिटीच ड्रग्स कनेक्शन समोर आला आहे. अनन्या पांडेच्या दोन्ही मोबाईल मधला डेटा जमा करण्याचे काम एनसीबी कडून करण्यात येत आहे. ज्यामुळे अनन्या खर बोलत आहे की खोटे हे तपासून पाहिले जाऊ शकेल आणि म्हणून तिला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

एनसीबीला अनन्या पांडे हिने सांगितले की एकाच गेट-टुगेदरमध्ये तिने फक्त एक किंवा दोन पफ याचे ट्राय केले होते, पण तिने कधीच ड्रग्स सप्लाय केले नाही आणि त्याचे सेवनही करत नाही. मित्रांच्या गेट-टु गेदर मध्ये अनन्या जर मुंबईत असली, तर ती थेट गेट-टुगेदरमध्ये जायची, तिथे आर्यन खान सुद्धा असायचा. त्या गेट-टुगेदरमध्ये तिने काही मित्रांना गांजाचे सेवन करताना पाहिले आहे, पण त्या पार्टीमध्ये हा गांजा कसा आला किंवा कोणी आणला याची आपल्याला माहिती नसल्याचे एनसीबीला अनन्याने सांगितले.