यंदाच्या फेस्टीव्ह सिझन मध्ये स्मार्टफोन विक्री ५७ हजार कोटींवर जाणार?


२०२१ चा मोठा फेस्टीव्ह सिझन सुरु झाला असून काही दिवसात दिवाळी साठी अनेक बड्या कंपन्या आणि ई कॉमर्स कंपन्या सेल आणि डिस्काऊंटचे आकर्षण ग्राहकांना दाखवू लागल्या आहेत. रिसर्च फर्म काउंटरपॉइंटच्या रिपोर्ट नुसार या सिझन मध्ये स्मार्टफोन विक्री सर्वाधिक होण्याचे संकेत आहेत. सेल साठी अनेक कंपन्यांनी स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध केले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत सरासरी विक्री किंमत १४ टक्के वाढली आहे. ही किंमत २३० डॉलर्स म्हणजे १७२०० रुपये आहे.

किमती वाढूनही मिडीयम आणि प्रायमरी स्मार्टफोनना ग्राहकांची अधिक पसंती असल्याने या सिझन मध्ये स्मार्टफोन विक्री विक्रमी ५६८५८ कोटीं रुपयांवर जाईल असा अंदाज आहे. दर फेस्टीव्ह सिझन मध्ये भारतात स्मार्टफोन मागणी वाढते. दसरा दिवाळी काळात ही वाढ विशेष असते. यंदाचे विशेष म्हणजे जागतिक स्मार्टफोन उद्योगात फोनसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची टंचाई असतानाही स्मार्टफोनला मागणी वाढली आहे. परिणामी स्मार्टफोनच्या किमती वाढणार आहेत.

गेले दीड वर्षे करोना मुळे होणारे उद्योगांचे नुकसान या सिझन मध्ये भरून निघेल असेही या रिपोर्ट मध्ये नमूद केले गेले आहे.