मेड इन इंडिया बीएमडब्ल्यू ५३० आय एम स्पोर्ट लाँच


जर्मनीच्या जायंट ऑटो कंपनी बीएमडब्ल्यूने गुरुवारी भारतात नवी ५ सिरीज एम स्पोर्ट कार्बन एडीशन लाँच केली आहे. या कारची एक्स शो रूम किंमत ६६ लाख ३० हजार रुपये असून तिचे उत्पादन चेन्नई मधील प्रकल्पात केले गेले आहे. या कार साठीचे बुकिंग सुरु झाले आहे.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह यावेळी बोलताना म्हणाले भारतात बीएमडब्ल्यू फाईव्ह सिरीज यशस्वी सेदान मधील एक ठरली आहे. नवीन कार्बन एडिशन फाईव्ह सिरीज सेगमेंटचा उत्साह वाढवेल याची खात्री आहे. ही कार अतिशय आकर्षक स्वरुपात तयार केली गेली आहे.

या कारला अनेक आकर्षक एक्स्टीरीअर एलिमेंट दिली गेली आहेत. किडनी ग्रील, फ्रंट अॅटॅचमेंट, स्लीप्टर्स गडद काळ्या कार्बन फायबर रंगात आहेत. मिरर कॅप साठी हाच रंग आहे. कारला ट्विन पॉवर टर्बो टेक्नोलॉजीसह २.० लिटर, चार सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले गेले असून ही कार ० ते १०० किमीचा वेग ६.१ सेकंदात घेते.