आयपीएल २०२२ साठी दोन नव्या टीम सामील केल्या जात असून अनेक उद्योगसमूह त्या खरेदी करण्यासाठी दावा करत आहेत. यात आणखी एक नाव पुढे आले असून इंग्लंडच्या प्रसिद्ध युनायटेड मँचेस्टर हा फुटबॉल क्लब आयपीएलची नवी टीम खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच बीसीसीआयने निविदा मागविण्याची तारीख मुदत वाढविली असल्याचेही सांगितले जात आहे.
या प्रसिद्ध फुटबॉल क्लबला आयपीएल टीम खरेदीत रस
युनायटेड मँचेस्टर संघात पोर्तुगालच्या स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो नुकताच सामील झाला आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू या क्लबचे चाहते आहेत. एएनआयच्या वृत्तांनुसार आयपीएल आता फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नसून ग्लोबल युनिट बनले आहे. बीसीसीआयने नुकतीच टेंडर मुदत वाढविली होती. टीम संबंधित कागदपत्रे खरेदी करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर होती. त्यामुळे २५ ऑक्टोबर पर्यंत नवीन टीमची घोषणा होईल असा अंदाज आहे.
नियमानुसार जर कोणत्याही विदेशी कंपनीने लिलावात सर्वाधिक बोली लावली तर त्यांना भारतात एक कंपनी सुरु करावी लागते. अनेक शहरांच्या नावाच्या टीम खरेदीसाठी प्रयत्नशील असून त्यात अहमदाबाद, लखनौ या शहराची नावे आघाडीवर आहेत असे सांगितले जात आहे.