आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यावर आता आर्यनचे वकील उच्च न्यायालयात धाव घेत असतानाच एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना केंद्राने सहा महिने मुदतवाढ दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एनसीबीच्या निशाण्यावर आता निर्माता दिग्दर्शक करण जोहर असून त्याने वर्षापूर्वी शेअर केलेल्या त्याच्या एका पार्टीचा व्हिडीओ तपास अजूनही एनसीबीने बंद केला गेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक बॉलीवूड सेलेब्रिटी एनसीबीच्या रडारवर येतील असे संकेत मिळत आहेत.
समीर वानखेडेना मुदतवाढ, बॉलीवूड सेलेब्रिटी एनसीबीच्या रडारवर
एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार करण जोहर याने जो पार्टी व्हिडीओ शेअर केला होता त्यात रणबीर कपूर, विक्की कौशल, वरून धवन, शाहीद कपूर, मलाईका अरोरा, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी ड्रग्स घेत असल्याचे आरोप झाले होते. हा व्हिडीओ २८ जुलै २०१९ चा आहे. करणने या पार्टीत कुणीही ड्रग्स घेतले नव्हते असा खुलासा पूर्वीच केला आहे. त्यावेळी सुद्धा या व्हिडीओची तपासणी एनसीबी कडून झाली होती पण सुशांत सिंग मृत्यू नंतर ड्रग्सच्या दृष्टीकोनातून रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, अरमान कोहली आणि आता आर्यन खान तपासाच्या तारा एकमेकांशी जुळत असल्याचे समोर येत आहे असे समजते.
पेड्लर नेटवर्क ते ड्रग घेणारे एकमेकांना ओळखतात असे एनसीबीचे म्हणणे आहे. आर्यन केस एनसीबीसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा असून राजकीय पक्षाचे नेते सुद्धा एनसीबी विरोधात पुरावे नसताना आर्यन विरोधात कारवाई करण्यात आल्याचे आरोप करत आहेत. आणि म्हणूनच एनसीबीने कंबर कसून सर्व ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे थोड्याच दिवसात आणखी काही सेलेब्रिटीची एनसीबी कार्यालयात परेड होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.