नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचा पलटवार


मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (एनसीबी) ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे. NCB च्या मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून वसुलीबद्दल ते बोलले आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मलिक यांच्या आरोपावर सांगितले की, नवाब मलिक खोटे आहेत आणि मी त्यांच्यावर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करेन.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी एक व्हिडिओ जारी केला, ज्यात म्हटले आहे की कोरोनाच्या काळात फिल्म इंडस्ट्रीचे अनेक सेलिब्रिटी मालदीव आणि दुबईमध्ये होते. दरम्यान, या ठिकाणी NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे कुटुंबीयही होते. वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांचा सोशल मीडिया फोटो देखील मलिक यांनी प्रसिद्ध केला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे यांना विचारले आहे की मालदीव आणि दुबईमध्ये त्यांचे कुटुंबीय काय करत होते आणि या काळात ते स्वतः तेथे होते की नाही? त्यांनी याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे.

दरम्यान कॅबिनेट मंत्री असुन देखील नवाब मलिक स्पष्ट खोटे बोलत आहेत. माझ्या आयुष्यात मी कधीच दुबईला गेलो नाही. हे कार्टून नेटवर्क चालवणे मलिक आता बंद करा. मी लवकरच त्याच्याविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. या प्रकारचा इशारा NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना दिला.

NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मालदीवला जाण्याच्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले की मी मालदीव सरकारची परवानगी घेतल्यानंतर आणि स्वखर्चाने कुटुंबासोबत गेलो होतो. यासह त्यांनी असेही सांगितले की एनसीबीने जेव्हापासून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून काही लोक त्यांना भयभीत करून एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.