पुण्यात आज एकही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद नाही


पुणे – कोरोनामुळे कधीकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला. कारण, पुणे शहरात जवळपास आठ महिन्यानंतर आज कोरोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही !, पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळाला, असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आज पूर्णपणे ओसरताना दिसत आहे. कारण, दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाबाधितांची दैनंदिन मृत्यू संख्या देखील घटली आहे.