ड्रग्ज प्रकरण; आर्यनसोबत ड्रग्जबद्दल एका अभिनेत्रीनेही केली चर्चा, व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठा खुलासा


मुंबई – सध्या आर्थर रोड तुरुंगात क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान असून शाहरुख खान त्याला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार की दिवाळीदेखील तुरुंगात घालवावी लागणार हे पहावे लागणार आहे. पण एनसीबीने न्यायालयासमोर आर्यन खानला अडचणीत आणणारा आणखी एक पुरावा सादर केला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून तो सध्या जेलमध्ये आहे. गेल्या सुनावणीत आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती एनसीबीने न्यायालयात दिली आहे. हे संभाषण एनसीबीने न्यायालयात सादर केले आहे. एनसीबीने ही माहिती न्यायालयात गेल्या सुनावणीत दिली आहे.

आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग एनसीबीने तपासले असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केले असल्याचे समोर आले आहे. २ ऑक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतील ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणे झाले होते. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती. ड्रग्जवरुन या अभिनेत्री आणि आर्यन खानमध्ये अनेकदा चॅटिंग झाले आहे. एनसीबीने याआधी आर्यन खानचे काही ड्रग्ज तस्करांसोबत संभाषण झाल्याचे पुरावे दिले होते.