काटछाट न करता ‘सूर्यवंशी’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदिल


येत्या ५ नोव्हेंबरला अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशी’ चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाला नुकताच सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. कोणतीही कात्री न लावता सीईओ रविंद्र भाकड यांनी U/A सर्टिफिकेट दिले आहे. हा चित्रपट १४५ मिनिटांचा आहे.

दसऱ्याच्या शुभमुहर्तावर शुक्रवारी १५ ऑक्टोबरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन (CBFC) सीईओ रविंद्र भाकड यांना ‘सूर्यवंशी’ चित्रपट दाखवण्यात आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून त्याला U/A सर्टिफिकेट मिळाले आहे. तसेच या चित्रपटातील कोणाताही सीन वगळला किंवा कापला जाणार नसल्याचेही सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनला उद्यापासून म्हणजे २१ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी मोठे प्रमोशन केले जाणार आहे. याच दिवशी चित्रपटातील एक गाणेही लाँच केले जाणार आहे. या गाण्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघेही दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.