युजरच्या पश्चात काय होते त्याच्या गुगल अकौंटचे?


गुगल आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आज कोट्यावधी युजर्स गुगल सेवा आणि विविध गुगल अकौंटचा वापर करत आहेत. या मार्फत युजरचा पर्सनल तसेच तो करत असलेल्या अनेक व्यवहाराचा प्रचंड डेटा गुगल कडे जमा होत असतो. जीमेल, फोटो, सेवा वापर आणि फक्त अँड्राईड फोन युजर वापरत असेल तर त्याची बरीच माहिती गुगल कडे आहे हे नक्कीच असते. अश्या माहितीमध्ये युजरची संवेदनशील माहिती सुद्धा असते. पण समजा युजरचा मृत्यू झाला तर या डेटाचे काय होते याची माहिती अनेकांना नाही.

बँक अकौंट, गुगल पे सारख्या संवेदनशील माहितीचे आपल्या पश्चात काय करावे यासाठी गुगलची एक योजना आहे. वास्तविक बराच काळ तुमचे अकौंट वापरत नसेल तर असे अकौंट निष्क्रीय होते. पण आपल्यां पश्चात कुणी विश्वासूने आपले अकौंट शेअर करावे, त्याकडे लक्ष द्यावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याची सुविधा मिळते. आपले अकौंट कधी निष्क्रीय समजले जावे हे ठरविण्याचा अधिकार गुगल तुम्हाला देते. तुमचा गुगल कडे असलेला डेटा अकौंट निष्क्रीय झाल्यावर त्याचे काय करायचे किंवा ठराविक डेटा तुमच्या विश्वासातील व्यक्तीला शेअर करण्याची सुविधा यात मिळते.

यामुळे युजर आपले खाते कधी निष्क्रीय समजले जावे याचा वेटिंग पिरियड ठरवू शकतो. १८ महिन्यापर्यंत ही मुदत मिळते. यासाठी myaccount.google/inactive येथे जायचे. पासवर्ड शेअर करावा लागत असल्याने तुम्हाला आपण ज्या व्यक्तीला शेअर करण्याची परवानगी देणार त्याच्यावर विश्वास हवा. तेथे सर्व माहिती भरली की निष्क्रियता वेळ ठरविता येतो. गुगल तुम्हाला त्यासाठी १० व्यक्ती निवडण्याचा पर्याय देते. त्यातील कुणाबरोबर तुमचा डेटा शेअर करायचा हे सांगावे लागते अन्यथा तुमचे अकौंट निष्क्रीय आहे असे समजून त्याचा वापर करता येत नाही. डेटा मधील काहीच भाग अॅक्सेस करण्याची परवानगी तुम्ही देऊ शकता मात्र त्यासाठी खात्रीलायक ई मेल आयडी आवश्यक असतो. सेटअप करताना तुम्ही लिहिलेल्या सब्जेक्ट नुसार तुमच्या विश्वसनीय व्यक्तीला ई मेलं पाठविला जातो. पण तुम्हाला जर तुमचा सर्व डेटा हटवायचा असेल तर तुमचा सर्व डेटा हटविला जातो.