चंद्रावर सुद्धा राहता येणार २४ तास कनेक्ट


अमेरिकन स्पेस एजन्सी नासा २०२४ च्या मानव सहित चंद्र मोहिमेपूर्वी चंद्रावर वायफाय सुरु करण्याच्या तयारीला लागली असून त्यासाठी नोकिया सह अनेक कंपन्यांशी सहाकार्य करार केला गेल्याचे सांगितले जात आहे. नासाच्या ग्लेन रिसर्च सेंटरचे डायरेक्टर मॅरी लोबो यांनी या संदर्भात एक प्रेस रिलीज दिले आहे. त्या नुसार आर्टेमिसच्या मदतीने चंद्रावर अंतराळवीर पाठविण्यात येणारी आव्हाने आणि अमेरिकन समाजात वाढत्या समस्यांवर तोडगा काढण्याची संधी या मुळे मिळणार असल्याचे म्हटले गेले आहे.

वायफाय प्रोग्राम साठी अध्ययन सुरु झाले असून इनसायडरच्या वृत्तानुसार कंपास लॅबचे स्टीव्ह ओल्सन यांनी हे अध्ययन फार महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. यामुळे आर्टेमिस बेस कॅम्पशी संबंधित क्रू, रोव्हर्स, विज्ञान आणि उत्खनन उपकरणे पृथ्वीच्या संपर्कात राहण्यासाठी एका चांगल्या कनेक्शनची आवश्यकता आहे. शिवाय अमेरिकेत डिजीटल असमानता, व उत्तम दर्जाची इंटरनेट सेवा सर्वत्र उपलब्ध नाही तामुळे सामाजिक आर्थिक चिंता निर्माण झाली आहे. चंद्रावर वायफाय सेवा सुरु करताना टोकाचे तापमान, रेडीएशन, निर्वात पोकळी या सर्वांचा विचार करावा लागणार आहे. त्यादृष्टीने फोर जी सेवा कशी देता येईल याचे डिझाईन केले जाणार आहे. पृथ्वीची थेया या ग्रहाशी टक्कर झाल्याने ४.५ अब्ज वर्षापूर्वी चंद्र निर्माण झाला असे सांगितले जाते.