जर पाकिस्तानसोबत सामना टीम इंडियाने खेळला नाही, तर टीम इंडियावर घालू शकते बंदी आयसीसी


नवी दिल्ली – टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून, पाकिस्तान विरोधात भारताचा पहिला सामना होणार आहे. अनेक क्रिकेटप्रेमी भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत असून, हा सामना 24 ऑक्टोंबर होणार आहे. त्याआधी भारत-पाकिस्तान सामन्याला रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. कारण जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी परराज्यातील नागरिकांना लक्ष करून, भरदिवसा त्यांची हत्या करत आहे. त्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत आहे. त्यामुळे पाकिस्तानला असे वाटत आहे की, भारत-पाकिस्तान सामना व्हावा.

काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जर टीम इंडियाने पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास नकार दिला, तर यात भारताला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. कारण पाकिस्तानला सामना न खेळल्यानंतरही 2 पॉइंट्स मिळू शकतात. त्यामुळे पाकिस्तानला सेमीफाइनलमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. तर भारतासाठी फायनलपर्यंत जाणे कठीण होऊ शकते.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 मध्ये भारताने पाकिस्तानसोबत खेळण्यास मनाई केली होती. त्यानंतर पाकिस्तानने आयसीसीला अनेक तक्रारी देखील केल्या, पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हा सामना होऊ दिला नाही. यावेळीही जर भारत-पाकिस्तान सामना आयसीसीने रद्द केला तर त्यांना मोठा आर्थिक नुकसान होऊ शकते. भारत-पाकिस्तान सामना व्हावा यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. अशात जर भारताने टी-20 न खेळण्याचा निर्णय घेतला, तर आयसीसी टीम इंडियावर कारवाई करू शकते व मोठ्या प्रमाणात दंड देखील आकारू शकते.

24 ऑक्टोंबरला होणारा सामना जर रद्द झाला किंवा टीम इंडियाने खेळण्यास मनाई केली, तर टीम इंडियाला 2 पॉइंट्सपासून मुकावे लागेल. पण तरीही जर आपण हा सामना रद्द झाल्यानंतरही दुसरा टीमसोबत चांगल्या प्रकारे खेळून जर फायनलपर्यंत पोहोचलो आणि तेथेही जर भारताचा पाकिस्तान सोबत सामना झाला तर? तेव्हा आपण काय करणार? तेथेही आपण फायनलमध्ये पाकिस्तान सोबत सामना खेळणार नाही. जर भारताने असे केले तर विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला हार मानून पाकिस्तानला विजयी होताना पाहावे लागेल.