टाटाची बहुप्रतीक्षित Punch भारतात लॉंच; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत


मुंबई – आपल्या बहुप्रतिक्षित मायक्रो एसयूव्ही टाटा पंच आज १८ ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्स या स्वदेशी ऑटोमोबाईल कंपनीने लाँच केली. तुम्ही सुद्धा जर टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज टाटा मोटर्सच्या या छोट्या एसयूव्हीची वैशिष्ट्ये, बुकिंग आणि डिलिव्हरी तपशील तसेच किंमतीबद्दल सांगणार आहोत.

टाटा मोटर्सने दिवाळीपूर्वी आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा ‘पंच’ लाँच केली. कंपनीने ५.४९ लाख रुपये टाटा पंचची सुरुवातीची किंमत ठेवली आहे. ४ ऑक्टोबर रोजी कंपनीने अधिकृत बुकिंग सुरु केले होते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला प्रौढ सुरक्षेच्या दृष्टीने पंचतारांकित रेटिंगही मिळाली आहे. आता बाजारात सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दुसरा पर्याय मिळेल. कंपनीने दावा केला आहे की ती मॅन्युअल ट्रान्समिशनवर १८.९७ kmpl आणि AMT वर १८.८२ kmpl चे मायलेज देईल.

कंपनीच्या ALFA (Agile Light Flexible Advanced) प्लॅटफॉर्मवर टाटा पंच विकसित करण्यात आली आहे. त्याच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १.२ लीटर ३ सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे ८५ bhp पॉवर आणि ११३ Nm टॉर्क जनरेट करते. हे ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्यायांसह दिले जाते. टाटा पंचला इको आणि सिटी सारखे २ ड्रायव्हिंग मोड देखील मिळतात. त्याच वेळी, सुरक्षेच्या बाबतीत, त्याला ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश सेफ्टी टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.

टाटा पंचचे बाह्य आणि आतील भागही नेत्रदीपक आहेत. त्याचा मागील आणि पुढचा लुक बर्‍यापैकी मस्कुलर आहे, म्हणून तो आकाराने लहान असला तरी तो खूप शक्तिशाली दिसतो. फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, टाटा पंचमध्ये ७-इंच हर्मन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, iRA कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ९० डिग्री उघडणारे दरवाजे, ऑटो हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर, क्रूज कंट्रोल, १६-इंच डायमंड कट अॅलॉय व्हील आहेत. विशेष फीचर्स आहेत, जी लोकांना खूप आवडतील.