कमी-जास्त प्रतीचा गांजा संजय राऊतांना चांगलाच कळतो; नितेश राणेंची खोचक टीका


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात चांगलेच सुनावले होते. ज्या पद्धतीने विरोधी पक्षांची सरकार असणाऱ्या राज्यात केंद्र सरकार वागत आहे. त्यावरून त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा घुसला असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुखांनी लगावला होता. त्यावर आता हळूहळू राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनी त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.


नितेश राणे यांनी ट्विट करत लिहले आहे की, मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते. गांज्यावर इतके प्रेम बर नाही. असे ट्विट करत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यावर आता शिवसेनेकडून काय उत्तर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान भाजप व त्यांचे केंद्रातील सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते संपवतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना लगेचच मान्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता, हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आता आज शिवसेनेने सामनातील अग्रलेखातून उत्तर दिले आहे.