काल दिवसभरात देशात 13596 कोरोनाबाधितांची नोंद, तर 166 रुग्णांचा मृत्यु


नवी दिल्ली : आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 13,596 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 166 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. तर देशात 19,582 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या 230 दिवसांनी सर्वात कमी झाली आहे.

कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 40 लाख 81 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 52 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 39 हजार बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे. एकूण 1 लाख 89 हजार 694 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात 1 हजार 715 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 680 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 19 हजार 687 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.39 टक्के आहे. दरम्यान, राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा डेथरेट 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 28 हजार 631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

काल दिवसभरात मुंबईत 367 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 418 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,27,084 बाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत काल दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या मुंबईत 5030 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर 1214 दिवसांवर गेला आहे.