बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून अभिनेता विकी कौशल हा एक आहे. विकीचे लाख चाहते आहेत. विकीचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे. पण, सध्या या चित्रपटाव्यतिरिक्त विक्कीच्या खासगी आयुष्याविषयी ही चर्चा सुरु आहेच. विकी आणि कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याचबरोबर त्यांचा साखरपुडा झाला असुन ते लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने स्वत: याविषयी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
विकी कौशलने कतरिनासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर केले शिक्कामोर्तब?
विकी आणि कतरिना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु असताना त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, विकीने आता पहिल्यांदा यावर भाष्य केले आहे. विकीने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘ई-टाइम्स’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याच्या आणि कतरिनाच्या साखरपुड्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. ही बातमी तुमच्या मित्रांनी पसरवली आहे. मी सुद्धा लवकरच साखरपुडा करेन, पण त्याची वेळ आल्यावर, असे विकी म्हणाला.
विकी कौशलचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशलने कतरिना आणि विकीच्या साखरपुड्याच्या बातमीवर याआधी प्रतिक्रिया दिली होती. त्याचबरोबर त्यांच्या घरात या बातमीवरून झालेला मजेशीर किस्साही सांगितला होता. दरम्यान, विकी आणि कतरिना हे दोघे बऱ्याचवेळा एकत्र दिसतात. विकीला बऱ्याचवेळा कतरिनाच्या घरीच्या बाहेर फोटोग्राफर्सने स्पॉट केले आहे. तर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसले आहेत.