काल दिवसभरात देशात १४ हजार १४६ कोरोनाबाधितांची नोंद, तर १४४ बाधितांचा मृत्यु


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस घसरण होत आहे. काल दिवसभरात देशात १५ हजारांपेक्षाही कमी बाधितांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात देशात १४ हजार १४६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, १९ हजार ७८८ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. या नवीन बाधितांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ४० लाख ६७ हजार ७१९ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३ कोटी ३४ लाख १९ हजार ७४९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून ४ लाख ५२ हजार १२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील २ लाखांपेक्षा कमी झाली आहे. देशात सध्या १ लाख ९५ हजार ८४६ अॅक्टिव्ह रुग्ण उपचाराधीन आहेत. ही गेल्या २२९ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९८.१० टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ४१ लाख २० हजार ७७२ जणांचे लसीकरण करण्यात आले. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ९७ कोटी ६५ लाख ८९ हजार ५४० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.