राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच देश सुरक्षित आहे – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर


नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच देश सुरक्षित असल्याचे मत भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. केवळ संघच जगामध्ये बंधुत्वभाव टिकून राहण्यासाठी जबाबदार असल्याचा दावा प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. तसेच आपल्याला उपद्रव माजवणाऱ्या लोकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच शांती मिळाल्याचेही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यावेळी छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर होत असल्याचा आरोप केला. संघ हे धर्मांतर रोखण्याचे काम करत असल्याचेही त्या म्हणाल्या. विश्वामधील बंधुत्वाची भावना जिवंत असेल, तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आहे. संघामुळेच देश आरएसएसमुळे सुरक्षित आहे. कुठेही कोणत्याप्रकार उपद्रवी लोकांपासून आपल्याला शांती मिळते ती संघामुळे असल्याचे प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुढे बोलताना, मी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छिते की त्यांच्या राज्यात, प्रदेशामध्ये त्यांनी वाकून पहावे. येथे एवढ्या मोठ्याप्रमाणात धर्मांतर होत आहे की हिंदूंचे धर्मांतर करुन त्यांना ख्रिश्चन धर्मात प्रवेश दिला जात आहे. याचे पुरावे देखील आहेत. ज्यामुळे जनता त्रस्त आहे. येथे एवढा भ्रष्टाचार आहे, एवढा अन्याय होत आहे, तरी ते शांत बसले. त्यांनी जरा या गोष्टींकडे पहावे, असा सल्ला दिला आहे.

त्यांना संघाला समजून घेण्यासाठी काही पिढ्या किंवा जन्म खर्च करावे लागतील. तरीही त्यांना संघ समजून घेता येणार नाही, कारण त्यांच्याकडे ते समजून घेण्याचा भावच नसल्याची टीका प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केली आहे. तसेच पुढे बोलताना, काँग्रेसला पूर्ण मतांतर संघामुळे करता येत नाही, त्यांना दहशतवाद पसरवता येत नाही. संघ यावर अंकूश लावत असेल, तर ते सत्ता गाजवत आहेत असे नाहीय. संघाची सत्ता नाही. पण संघ ही संघटना घराघरात, जन माणसामध्ये रुझलेली आहे, म्हणून ते संघाला त्रासलेले असल्याचेही प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी, टीका करणाऱ्यांचा संघाला काही फरक पडत नसल्याचे मला वाटते. आधी आपल्या घरात पाहा मग बाहेर बघा, असा खोचक सल्लाही विरोधकांना दिला आहे.