लाईव्ह चर्चेदरम्यान संबित पात्रांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली


नवी दिल्ली – लाईव्ह चर्चेदरम्यान जेव्हा काँग्रेस नेते गजेंद्र सिंह साखला यांना अँकर आणि पत्रकार नविका कुमारने प्रश्न विचारला, तेव्हा त्यावरुन भाजप नेते संबित पात्रा यांनी त्यांची खिल्ली उडवली. नविका कुमार यांनी टाइम्स नाऊवरील या चर्चेदरम्यान ‘सवाल पब्लिक का’ कार्यक्रमात गजेंद्र साखला यांनी विचारले की, तस्लीम रहमानी यांचे म्हणणे आहे, तशीच काँग्रेसची विचारसरणी आहे का?. काँग्रेस नेता गजेंद्र सांखला यांना नलिकाने प्रश्न विचारला की, त्या विचारसरणीशी तुम्हीही सहमत आहात का? जी म्हणते या देशाची निर्मिती मुघलांनी केली आहे, बाबररने केली आहे? काँग्रेस पक्ष याच्याशी सहमत आहे का?.

गजेंद्र साखला यावर उत्तर देताना म्हणाले की, मोहेंजोदडोच्या काळात दगडातून आग निर्माण केली जात होती, आम्ही असे मानतो. तितका विकास त्यावेळी झाला नव्हता, असे तुम्हीच मानता. भाजपचे हे प्रवक्त वारंवार काँग्रेसने काहीच काम केलेले नाही गेल्या सात-साडे सात वर्षांपासून सांगत असतात.

भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी गजेंद्र साखला यांच्या उत्तरावरुन टोला लगावण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, मोहेंजोदडोमध्ये काँग्रेस काय करत होती? हे मला समजत नाही. मोहेंजोदडोमधून राहुल गांधी आले आहेत का? काय बोलत असता तुम्ही साखला साहेब…तुमचे म्हणणे पूर्ण कधी होणार, चर्चा संपायला आली आहे. मोहेंजोदडो, राहुल गांधी, काँग्रेसवादी…कमाल आहे. मोहेंजोदडोलाच पाठवा राहुल गांधींना, ते तिथलेच पंतप्रधान होऊ शकतात.

नविका कुमार यानंतर म्हणतात की, सांखलाजी समस्या ही आहे की, काँग्रेस पक्षाकडे दुसऱ्याला श्रेय देण्यासाठी वेळच नाही. श्रेयाची चिंता सतावत आहे. वीर सावरकरांशी काही देणे घेणे नाही, ना बाबरशी, ना मुघलांशी…हे तर असे म्हणत आहेत की श्रेय द्यायचे असेल तर फक्त गांधी कुटुंबाला द्या. किमान साखलांच्या बोलण्यावरुन तरी तसेच वाटत आहे. सांखला यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, काय कारण आहे की, काँग्रेस वारंवार सावरकरांसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करते?. ते यावर उत्तर देताना म्हणाले की, जी व्यक्ती गेली आहे, त्याला देवाचा दर्जा देत सर्व गोष्टी विसरुन पुढची वाटचाल करणे ही आपल्या देशाची परंपरा आहे. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे.