काल दिवसभरात देशात 18,987 कोरोनाबाधितांची नोंद, तर 226 बाधितांचा मृत्यु


नवी दिल्ली : देशात काल दिवसभरात 18 हजार 987 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 246 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात मंगळवारी 15 हजार 823 रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 226 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. झाला होता. काल नोंद करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्याच्या तुलनेत आजचा आकडा हा 16 टक्क्यांनी वाढला आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 19 हजार 808 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून 2 लाख 6 हजार 586 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात तीन कोटी 33 लाख 62 हजार 709 बाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे चार लाख 51 हजार 435 नागरिकांना आपला जीव गमावला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 2,219 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यातील 64 लाख 11 हजार 075 नागरिकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.38 टक्के आहे. तर काल राज्यात 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 281 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल दिवसभरात आर्थिक राजधानी मुंबईत 481 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 461 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 7,25,282 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत काल दिवसभरात तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 5114 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1102 दिवसांवर गेला आहे.