इन्फोसिस ४५ हजार फ्रेशर्सची करणार भरती
देशातील दोन नंबरची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने गुरुवारी या वर्षी कंपनी ४५ हजार फ्रेशर्सची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेग म्हणजे अॅट्रीशन रेट वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली आहे हे विशेष. यामुळे आयटी कंपन्यांत चांगले टेक्नोक्रॅट, टॅलंट भरतीची जणू चढाओढ सुरु झाल्याचे चित्र सध्या दिसते आहे.
इन्फोसिसचे सीईओ प्रवीण राव या संदर्भात बोलताना म्हणाले बाजारात असलेल्या सर्व संभावनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात असून या वर्षी नव्या कॉलेज पदवीधर भरतीत वाढ केली आहे. यंदा ४५ हजार फ्रेशर्सची भरती केली जाणार आहेच पण कर्मचाऱ्यांच्या हेल्थ व वेलनेस सुविधा, रीस्किलिंग प्रोग्राम व करियर ग्रोथ संधींवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नेट प्रॉफीट मध्ये ११.९ टक्क्यांची वाढ होऊन तो ५४२१ कोटींवर गेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.