नव्या जर्सीसह मैदानात उतरणार टीम इंडिया; बीसीसीआयने लाँच केली जर्सी


नवी दिल्ली – भारतीय संघाची नवी जर्सी यूएई आणि ओमानमध्ये सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी लाँच करण्यात आली आहे. आज ट्वीट करून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने टीम इंडियाची नवी जर्सी लाँच केली आहे. ट्वीटमध्ये बीसीसीआयने लिहिले, बिलियन चीयर्स जर्सी सादर करत आहोत. विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसत आहेत.


आज होणाऱ्या भारतीय संघाच्या नव्या जर्सीच्या लाँचबद्दल बीसीसीआयने यापूर्वी माहिती दिली होती. भारतीय संघाची ही नवी जर्सी जुन्या जर्सीपेक्षा थोडी वेगळी आहे. भारतीय संघ आत्तापर्यंत जी जर्सी परिधान करत होता, ती निळ्या रंगाची होती, ही नवी जर्सी देखील निळ्या रंगाची आहे परंतु यावरील डिझाइन थोडी वेगळी आहे. या जर्सीवर निळ्यारंगाचे पट्टे दिसत आहेत.

24 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना खेळेल. हा सामना पाकिस्तान विरोधात असेल. पाकिस्तान आणि भारताचे क्रिकेट संघ दोन वर्षानंतर आमने-सामने येणार आहेत. पाकिस्ताननंतर भारत 31 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात सामना खेळेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अबू धाबीमध्ये भारत अफगाणिस्तान विरोधात सामना खेळेल.