मुंबई : टाटा कंपनीच्या इलेक्ट्रीक वाहन उपकंपनीमध्ये प्रायव्हेट एन्टिटी ग्रुप असलेला TPG ग्रुप आणि अबुधाबीच्या ADQ ग्रुपकडून 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. येत्या 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. आपल्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स सेगमेंटसाठी TML EVCo या नावाने टाटा मोटर्सने नवीन युनिट बनवले आहे.
प्रायव्हेट एन्टिटी ग्रुप TPG ची टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक व्हेईकल्समध्ये 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक
पुढच्या मार्चमध्ये या गुंतवणुकीतील पहिला टप्पा हा पूर्ण होईल अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. या गुंवतणुकीच्या माध्यमातून TPG ग्रुपला 11 ते 15 टक्के भागीदारी मिळणार आहे. याबाबत माहिती देताना टाटा मोटर्सटचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी म्हटले आहे की, टाटा मोटर्स देशातील इलेक्ट्रिक व्हेईकलला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नात आता टीजीपी ग्रुपचे सहकार्य मिळत असून ही आनंदाची गोष्ट आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल्सला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्या माध्यमातून 2030 पर्यंत 30 टक्के ईलेक्ट्रिक गाड्या रस्त्यावर आणण्याचे लक्ष्य आहे. टाटा मोटर्सचा हे लक्ष्य गाठण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न आहे.
केंद्र सरकारने पर्यावरण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक व्हेईकल्सला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल्सला चालना देण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. एप्रिल 2021 मध्ये महिंद्रा अँड महिंद्राकडून पुढील तीन वर्षात तीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्या माध्यमातून 2025 सालापर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक व्हेईकल्स तयार करण्याचे लक्ष्य आहे. किया मोटर्सकडून देखील 2024 पर्यंत नवे इलेक्ट्रिक व्हेईकल्स बाजारात आणण्यात येणार आहे.