ओवैसी यांची राजनाथ सिंहांच्या वक्तव्यावरून टीका


नवी दिल्ली – महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन,या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी केले आहे. तर, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे.

चुकीचा इतिहास हे लोक मांडत आहेत. जर हे असेच चालू राहिले, तर ते महात्मा गांधींना काढून ज्या सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले होते, त्या सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.