खासदार अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यासाठी पत्र


मुंबई – 22 तारखेपासून राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे 50 टक्के क्षमेतने सुरु होणार आहेत. पण राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्यात यावीत अशी मागणी करत पत्र लिहिले आहे. 100 टक्के क्षमतेने थिएटर्स सुरु करा, अशी मागणी पत्राच्या माध्यमातून त्यांनी केली आहे.

राज्य सरकारने येत्या 21 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. पण हा निर्णय मागे घेऊन राज्यातील थिएटर्स 100 टक्के क्षमतेने राज्य सरकारने सुरु करावेत. कारण कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे आणि चित्रीकरण बंद असल्यामुळे अगोदरच कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे राज्यातील थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करुन कलाकारांना दिलासा द्यावा, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आपल्या पत्रात कोल्हे यांनी म्हटले आहे की, 50 टक्के क्षमतेने थिएटर सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तर तसे न करता थिएटर 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याची मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. 50 टक्के क्षमतेने थिएटर सुरु करणे आर्थिकदृष्ट्या कलाकारांना परवडणारे नाही, कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घेता 100 टक्के क्षमतेने थिएटर सुरु करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 50 टक्के आसनक्षमतेने थिएटर्स सुरु करण्याचा निर्णय व्यवसायाच्या मुळावर घाव घालणारा आहे.