टी २० वर्ल्ड कप, टीम इंडियाचा मेंटॉर झाला माही

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी टी २० वर्ल्ड कप साठी टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी पार पडणार आहे आणि यासाठी तो एक पैसाही मानधन घेणार नाही असे समजते. बीसीसीआयने या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या संदर्भात घोषणा केली असून माही विना मोबदला ही सेवा देणार असल्याचे म्हटले आहे.

१७ ऑक्टोबर पासून ओमान आणि युएई मध्ये वर्ल्ड कप सामने होत आहेत. या स्पर्धेतील भारतीय टीम मध्ये धोनीला मेंटॉर म्हणून स्थान मिळाले आहे. त्यामुळे ड्रेसिंग रूम मध्ये माही टीम इंडिया खेळाडूना प्रोत्साहन देताना दिसेल, टी २० वर्ल्ड कप साठी माहीची मेंटॉर म्हणून नियुक्ती भारतीय क्रिकेट साठी चांगले पाउल मानले जात आहे.

माहीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. मात्र टी २० मधील त्याचा अनुभव टीम इंडियाला नॉकआउट सामन्यात तसेच कप्तान विराट कोहली साठी महत्वाचा ठरेल असे मानले जात आहे.