आला विवो व्ही २१ फाईव्ह जी फोन

चीनी स्मार्टफोन कंपनी विवो त्यांच्या विवो व्ही २१ फाईव्ह जीचे नवे व्हेरीयंट आज भारतीय बाजारात सादर करत असून हा स्मार्टफोन अल्ट्रास्लीम फोन आहे. फ्लिपकार्ट आणि विवोच्या अधिकृत साईटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा कॅमेरा सेंट्रीक स्मार्टफोन आहे.

या फोनसाठी ६.४४ इंची एफएचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला असून मेडिया टेक हेलीओ डायमेंस्टी ८०० यु प्रोसेसर सपोर्ट दिला गेला आहे. रिअरला ट्रिपल कॅमेरा सेटअप असून मुख्य कॅमेरा ६४ एमपीचा आहे. ८ एमपी अल्ट्रावाईड तर २ एमपी मॅक्रोलेन्स आहे. फ्रंट कॅमेरा ४४ एमपीचा आहे. फोन साठी ४००० एमएएच, ३३ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी आहे. अँड्राईड ११ ओएस, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर अशी अन्य फिचर्स आहेत. हा फोन ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज अश्या दोन व्हेरीयंट मध्ये आहे. त्याच्या किंमती अनुक्रमे २९९९० आणि ३२९९० अश्या आहेत. हे निऑन स्पार्क कलर व्हेरीयंट आहे.