आम्ही नारी, लय भारी

nari
परमेश्वरालाही न सुटलेले कोडे म्हणजे तमाम स्त्री वर्ग असे म्हटले जाते. महिलांविषयी कोणताही अंदाज वर्तविताना कितीही काळजी घेऊन वर्तविला तरी त्यात त्रुटी राहणारच. कारण कोणती बाई कोणत्या वेळी कशी वागेल हे प्रेडीक्ट करणे महाकठीण काम असते. तरीही त्यांच्यात कांही समान गोष्टी असतात आणि जगभरातल्या महिला त्याला अपवाद नसतात. अशाच कांही समान गोष्टींची ही यादी तुमच्यासाठी

बायकांना काय आवडते हे ठामपणे सांगता येत नसले तरी त्यांना शॉपिंग करायला भयंकर आवडते हे नक्की.अगदी जीव की प्राण म्हणाना. त्यातही बार्गेनिग हा त्यांचा वीक पॉईंट. दुसरे म्हणजे खरेदी करताना संबंधित वस्तूची गरज महत्त्वाची नसते तर दिसेल ते खरेदी करणे त्यातही कशावर काही तरी फ्री असेल तर त्याला अधिक प्राधान्य देणे हे ओघानेच येते.

महिला वर्गाकडे कुठेही जायचे की कधीच चांगले कपडे नसतात. लग्न कार्य असो की रूग्णाला भेट देणे असो वा मयतीला जाणे असो त्यासाठी योग्य कपडे त्यांच्याकडे कधीच नसतात मात्र तरीही त्यांचे कपड्याचे कपाट मात्र ओसंडून वाहात असते. असे म्हणतात की सात दिवसांच्या ट्रीपवर एखादा पुरूष गेला तर तो कपड्यांचे जास्तीत जास्त ५ जोड घेतो तर महिला किमान २१ जोड घेतात. कारण प्रवासातही कुठे, कधी आणि काय घालावे लागेल हे सांगता येत नसल्याने जास्त कपडे बरोबर घेणे त्यांना सोयीस्कर वाटते. तसेच एखाद्या फंक्शनमध्ये आपल्यासारखीच साडी किवा ड्रेस दुसरीने घातला असेल तर महिला फारच अस्वस्थ होतात.

महिलांना रडायची गरज वारंवार भासते मात्र एकट्याने रडण्यात त्यांना समाधान मिळत नाही. त्यांचे रडणे तुम्हाला ऐकायला येतेय हे जाणवले की रडण्याचे खरे समाधान त्यांना मिळते. मी कशी दिसते या प्रश्नाचे खरे उत्तर महिलांना नको असते तसेच त्या कधीच कोणती चूक करत नाहीत त्यामुळे क्षमा मागण्याची जबाबदारी पुरूषांचीच असते. फोनबाबत महिला फार क्रेझी असतात. कितीही महत्त्वाचे काम करत असतील आणि फोन वाजला तर हातातले काम टाकून पहिला फोन घेण्याकडे त्यांचा कल असतो. फोनकडे दुर्लक्ष महिला वर्गात संभवत नाही.

पाली, किडे, झुरळे व तत्सम प्राण्यांना जगातल्या बहुतेक सर्व महिला घाबरतात. तसेच कोणतीही गोष्ट त्या गुपित ठेवू शकत नाहीत. बहुतेक क्षेत्रात पुरूषच्या तुलनेत महिलांना कमी पगार दिला जातो असा आरोप केला जातो. मात्र मॉडेलिंग हे क्षेत्र त्याला सणसणीत अपवाद आहे. अखंड बडबड हा महिला वर्गाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कोणताही लढा न देता तो त्यांना आपसूकच मिळाला आहे.. त्यात गॉसिपिंगचा हक्कही त्याना बाय लॉ मिळाला आहे अशी त्यांची कल्पना आहे. सेक्स ही पुरूषांसाठी शारिरीक क्रिया असली तरी महिला मात्र भावनिक दृष्ट्या याकडे पाहतात. त्यामुळेच आपल्याबरोबर पुरूषाने सेक्सची नुसती इच्छा व्यक्त केली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे ठरते असे संशोधन सांगते.

दुसरया बायकांकडे पाहता असा आरोप महिला वर्ग आपल्य नवरे मंडळींवर नेहमीच करतात. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की महिला महिलांकडे जितके निरखून पाहतात तेवढे पुरुष पाहत नाहीत.

Leave a Comment