मोटो ई ४० बजेट स्मार्टफोन आला

मोटोरोलाने त्यांचा बजेट स्मार्टफोन मोटो ई ४० भारतीय बाजारात १२ ऑक्टोबरला सादर केला असून या नव्या हँडसेटची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून होणार आहे. चारकोल ग्रे आणि क्ले पिंक अश्या दोन रंगात हा फोन उपलब्ध असून त्याचे जागतिक लाँचिंग अगोदरच झाले आहे.

या फोनला ६.५ इंची एचडी प्लस डिस्प्ले, सेल्फीसाठी पंचहोल डिस्प्ले दिला असून अँड्राईड ११ ओएस आहे. ड्युअल सीम, ट्रिपल रिअर कॅमेरा सेट असून मुख्य कॅमेरा ४८ एमपी, इम्प्रुव्हड नाईट फोटोग्राफी ऑप्शन सह आहे. या शिवाय डेप्थ कॅमेरा आणि मायक्रोव्हिजन सेन्सर आहे. हँडसेटवर एक गुगल असिस्टन्ट बटन असून रिअर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज बेसिक मॉडेल असलेल्या या फोनची मेमरी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढविता येणार आहे. जागतिक बाजारात या फोनची किंमत १४९ युरो म्हणजे १२९०० रुपये असून भारतात याच किमतीत हा फोन मिळेल असे समजते. फोन साठी ५००० एमएएच बॅटरी दिली गेली आहे.