बीएमडब्ल्यूची पहिली, मॅक्सी स्कूटर भारतीय बाजारात दाखल

बलाढ्य जर्मन ऑटो कंपनी बीएमडब्ल्यूने भारतीय बाजारात त्यांची पहिली मॅक्सी स्कुटर लाँच केली असून  या नावाने ती बाजारात आणली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ही स्कुटर अगोदरच दाखल झालेली आहे त्यामुळे डिझाईन आणि फिचर्स अनेकांना माहिती आहेत. भारतात ही स्कुटर प्रीमियम श्रेणीत असून तिची किंमत ५ लाख रुपये (एक्स शो रूम) असल्याचे समजते. १ लाख रुपये भरून तिचे बुकिंग करता येणार आहे. भारतीय बाजारात या स्कुटरची थेट स्पर्धा कुठल्याच स्कुटर बरोबर नाही.

या स्कुटरला फुल एलईडी लायटिंग, की लेस इग्निशन, अँटीथेप्ट सिक्युरिटी सिस्टीम, ब्ल्यू टूथ कनेक्टिव्हीटी, रायडिंग मोड सुविधा आहेत. मस्क्युलर बॉडी पॅनल एक पूर्ण मॅक्सी स्कुटर बॉडी किट दिले गेले आहे. लांब विंडस्क्रीन, पूलबॅक हँडलबार, मोठ्या स्टेपची सीट, ड्युअल फुट रेस्ट, हिटेड ग्रिप्स, हिटेड सीट आहे. सुरक्षेसाठी ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल चॅनल एबीसी फिचर आहे.

या स्कुटरला ३५० सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कुल इंजिन दिले गेले आहे.