लोणावळ्यातील सेक्स रॅकेटचा ग्रामीण पोलिसाकंडून पर्दाफाश; एकाला अटक


पुणे – लोणावळ्यातील एका सेक्स रॅकेटचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांनी एका पुरुषाला या प्रकरणात अटक केली आहे. ही व्यक्ती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचत होती. दिल्ली आणि छत्तीसगढवरुन आणण्यात आलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

धनंजय कटवारू राजभर असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील चेंबूर भागातला रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील इंडियन एक्सप्रेसने दिल असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की, लोणावळा आणि परिसरातून एक व्यक्ती काही महिलांचे फोटो आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर पाठवतो. शुक्रवारी मध्यरात्री सुरू केलेली ही कारवाई शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून या व्यक्तीशी व्हॉट्सअॅपवरुन संपर्क केला.

आरोपीने त्यानंतर सांगितले की तो लोणावळ्यातील वर्सोली भागात महिला उपलब्ध करुन देऊ शकतो. पोलिसांनी त्यानंतर त्या भागात जाऊन थोडी वाट पाहिली आणि त्यानंतर त्यांना एक गाडी त्यांच्या दिशेने येताना दिसली. गाडीतील व्यक्तींच्या प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी राजभर आणि दोन महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या गटाने राजभरला अटक केली असून दोन महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर प्रवीण मोरे यांनी दिली. आरोपीला न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, तसेच चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात येईल. ही कारवाई लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त कारवाई होती.