मुंबई – काल दिवसभरात राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ही आज कोरोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली आहे. राज्यात काल दिवसभरात २ हजार २९४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर १ हजार ८२३ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर, २८ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात काल दिवसभरात २ हजार २९४ कोरोनाबाधितांची नोंद
आजपर्यंत राज्यात एकूण ६४,०१,२८७ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९७.३२ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ६५,७७,८७२ झाली आहे. तर, राज्यात आतापर्यंत १३९५४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०१,९८,१७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,७७,८७२ (१०.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,८९२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल रोजी एकूण ३३,४४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.