नोबेल पुरस्कार, काही रोचक माहिती

गेले काही दिवस विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्काराच्या घोषणा होत आहेत. वैद्यकीय, रसायन, भौतिकी, साहित्य नंतर नुकतीच शांतता पुरस्काराची घोषणा झाली असून यंदा याचे मानकरी आहेत दोन पत्रकार. फिलीपिन्सच्या महिला पत्रकार मारिया रेसा आणि रशियन पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांना हा पुरस्कार मिळाला आहे. नोबेल पुरस्काराविषयी काही रोचक माहिती जाणून घेणे मनोरंजक आहे.

नोबेल पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सतर्फे केली जाते. पण शांततेसाठीचे नोबेल हे असे एकमेव नोबेल आहे, ज्याची घोषणा नॉर्वे संसदेने निवडलेल्या समिती मार्फत केली जाते. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाची नोबेलसाठी १९३७.१९३८.१९३९ आणि १९४७ अशी चार वेळा शिफारस झाली पण त्यांना एकदाही हा पुरस्कार मिळाला नाही. १९६८ मध्ये स्वीडन सेंट्रल बँकेने आल्फ्रेड नोबेल यांची आठवण म्हणून सॅव्हरिज रिक्सबँक प्राईजची स्थापना केली असून अर्थशास्त्राचे नोबेल या श्रेणीखाली दिले जाते.

१९२२ साली जन्मलेले जोन बी गुडएनफ हे नोबेल मिळविलेले सर्वाधिक ज्येष्ठ व्यक्ती असून आता ते ९९ वर्षांचे आहेत. त्यांना २०१९ साली नोबेल दिले गेले होते. पाकिस्तानची मलाला युसुफझायी ही नोबेल मिळविणारी सर्वात लहान वयाची मुलगी असून तिला १७ व्या वर्षी हा पुरस्कार दिला गेला. कॅनडाचे रुल्फ स्टॅनमन यांना रसायनशास्त्राचे नोबेल मरणोत्तर दिले गेले. याचे कारण म्हणजे या पुरस्काराची घोषणा होण्याच्याअगोदर काही तास त्यांचे निधन झाले होते पण पुरस्कार समितीला त्यांची माहिती न मिळाल्याने रुल्फ यांच्या नावाची घोषणा केली गेली होती.

जर्मनीच्या हुकुमशहा हिटलर याला शांततेसाठीचे नोबेल दिले जावे अशी शिफारस स्वीडनच्या खासदाराने १९३९ मध्ये केली होती. दुसऱ्या महायुद्धात हिटलरचे खलनायकी रूप जगापुढे आले होते. विशेष म्हणजे आत्तापर्यंत ४९ वेळा नोबेल पुरस्कारांची घोषणा केली गेली नव्हती आणि हा काळ पहिले आणि दुसरे जागतिक महायुद्धाचा होता. आत्तापर्यंत ५७ महिलांना नोबेल मिळाले आहे. दोन जणांनी नोबेल स्वीकारण्यास नकार दिला आहे तर चार जणांना नोबेल जाहीर झाल्यावरही ते विरोधामुळे घेऊ दिले गेलेले नाही.

जर्मन पत्रकार कार्ल वोन, म्यानमारच्या नेत्या आंग सु की, चीन मानवाधिकार कार्यकर्ते लियू शियाबो यांना तुरुंगात असताना हा पुरस्कार दिला गेला. विशेष म्हणजे वैद्यानिक आल्फ्रेड नोबेल यांनी अणुबॉम्ब शोधातून प्रचंड पैसा मिळविला आणि मृत्युपत्रात ही सर्व संपत्ती नोबेल पुरस्कारासाठी दान दिली होती.